महाराष्ट्राच्या वाट्याला नवे रेल्वेमार्ग

महाराष्ट्राच्या वाट्याला नवे रेल्वेमार्ग

  • Share this:

konkan-railway-heading-south25 फेब्रुवारी : रेल्वेमंत्री म्हणून सुरेश प्रभू हे महाराष्ट्रीयन मंत्री म्हणून लाभले. त्यामुळे महाराष्ट्राच्या पारड्यात काय पडतं याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पण, महाराष्ट्रासाठी कोणत्याही नव्या घोषणा झालेल्या नाहीत. परंतु, नवीन रेल्वेमार्ग आणि सर्वेक्षण होणार आहे. पुणे-नाशिक,वैभववाडी-कोल्हापूर आणि इंदोर-मनमाड व्हाया मालेगाव, जेऊर -आष्टी, लातूर - नांदेड व्हाया लोहा, गडचिंदूर - अदिलाबाद आणि जालना - खामगाव या मार्गावर नवीन रेल्वेमार्ग होणार आहे. तसंच दौंड - मनमाड दुपदरीकरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासाठी नवे रेल्वेमार्ग

पुणे - नाशिक

लांबी - 265 किमी

खर्च - 2 हजार 425 कोटी

वैभववाडी - कोल्हापूर

लांबी - 107 किमी

खर्च - 2 हजार 750 कोटी

इंदोर - मनमाड व्हाया मालेगाव

लांबी - 368

खर्च - 9 हजार 968 कोटी

जेऊर - आष्टी

लांबी - 78 किमी

खर्च - 1 हजार 560 कोटी

लातूर - नांदेड व्हाया लोहा

लांबी - 155 किमी

खर्च - 1 हजार 560 कोटी

गडचिंदूर - अदिलाबाद

लांबी - 70 किमी

खर्च - 1हजार 500 कोटी

जालना - खामगाव

लांबी - 155 किमी

खर्च - 3000 कोटी

दौंड - मनमाड दुपदरीकरण

लांबी - 236 किमी

खर्च - 1875 कोटी

या मार्गांचं होणार सर्वेक्षण

पाचोरा-जामनेर-मलकापूर

लांबी  - 104 किमी

बोधन - जळकोट

लांबी - 67 किमी

नरखेड - वाशिम

लांबी - 130 किमी

मानवत - परळी वैजनाथ

लांबी - 67 किमी

श्रीरामपूर- परळी

लांबी - 230 किमी

टिटवाळा- मुरबाड

लांबी - 22 किमी

गुलबर्गा- लातूर

लांबी - 148 किमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2016 04:48 PM IST

ताज्या बातम्या