25 फेब्रुवारी : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज लोकसभेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात नवजात मुलं, महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेवर भर देत विशेष तरतुदी करण्यात आल्या आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात महिलांसाठी 182 क्रमांकाच्या 24 तास हेल्पलाईन सेवेची घोषणा करून प्रभूंनी महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष्य दिलं आहे. तसंच लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये महिला आणि वृद्धांसाठी लोअर बर्थ कोटा आरक्षित ठेवण्यासह बेबी फुड, दूध आणि गरम पाण्याची सोय, त्याचबरोबर नवजात अर्भकांसाठी खाद्यपदार्थ रेल्वे स्टेशनांवर आणि ट्रेनमध्ये उपलब्ध होणार आहे.
याशिवाय रेल्वेतील प्रत्येक श्रेणीत महिलांना 33 टक्के आरक्षण कोटा मिळणार रेल्वेमंत्र्यांनी महिला वर्गाला मोठी भेट दिली आहे. तसंच वृद्धांना प्रवासात मदत करण्यासाठी सारथी सेवा सुरू करणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कोट्यात 50 टक्क्यांनी वाढवणार आहे. त्यासोबतचं, दृष्टीहिन प्रवाशांसाठी रेल्वे डब्यांमध्ये ब्रेल लिपीतील सूचनांची सोय करणार असल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलं असून, अपंगांना जाता येईल अशी स्वच्छतागृहे स्टेशनवर उभारणार आहे.
बजेटमधील घोषणा :
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv