मुंबईसाठी चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर

मुंबईसाठी चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर

  • Share this:

Railway budget 2016 (52)

मुंबई - 25 फेब्रुवारी : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज (गुरूवारी) संसदेत रेल्वेचं बजेट सादर केलं. मुंबईतील उपनगरीय रेल्वेसंदर्भात सुरेश प्रभू कोणत्या नव्या घोषणा करणार, याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष्य लागलं होतं. मात्र, सुरेश प्रभूंनी कोणत्याही मोठ्‌य़ा घोषणा करण्यापेक्षा मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित करण्याला प्राधान्य दिलं आहे.

यासाठी आगामी वर्षात उपनगरीय रेल्वेच्या सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार असून सर्व स्टेशन्सना अत्याधुनिक सेवा पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय, चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल या दोन नव्या एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारणीची घोषणा प्रभूंनी यावेळी केली.

बजेटमध्ये मुंबईकरांना काय मिळालं ?

  • चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारणार
  • चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर मेट्रो रेल्वे स्टेशनशी जोडणार
  • सुरक्षित प्रवासासाठी सर्व रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात
  • सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2016 02:57 PM IST

ताज्या बातम्या