रेल्वेमंत्री इकडं लक्ष द्या, रेल्वे स्थानकांवर पुरेशी स्वच्छतागृहं कधी ?

रेल्वेमंत्री इकडं लक्ष द्या, रेल्वे स्थानकांवर पुरेशी स्वच्छतागृहं कधी ?

  • Share this:

मुंबई - 24 फेब्रुवारी : रेल्वे ही केंद्र सरकार मार्फत चालवली जाणारी देशातली सर्वात मोठी यंत्रणा आहे. रेल्वेचा दरवर्षी एक वेगळा अर्थ संकल्प तयार केला जातो. कोट्यवधी लोक दररोज रेल्वेनं प्रवास करतात. पण एवढ्या मोठ्या यंत्रणेत स्वच्छतेच्या नावावर पुरती बोंबाबोंब असते. हे आम्ही म्हणत नाही. तर हे म्हणणं आहे, राईट टू पी या मोहिमेचं...

rail_staion_toiletsमुंबई उपनगरीय सेवा ही रेल्वे प्रशासनाला सर्वात जास्त उत्पन्न देणारा भाग आहे. रेल्वेच्या एकूण प्रवाशांपैकी 34 टक्के प्रवासी हे फक्त मुंबई उपनगरीय सेवेचा लाभ घेणारे आहेत. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देणारा भाग आणि वाहतूक करणार्‍या लोकसंख्येला रेल्वे प्रशासन साध्या मुतार्‍या आणि शौचालय सुद्धा पुरवू शकत नाही. हे आम्ही म्हणत नाहीये तर राईट टू पी या मोहिमेनं जानेवारी 2016 ला केलेल्या सर्वेक्षणात हे उघड झालंय.

रेल्वे शौचालयांची स्थिती

मुंबई महानगरातले 88 टक्के लोक हे लोकलचे प्रवासी

सर्वेक्षण केलेल्या 73 स्थानकांपैकी 67 ठिकाणीच शौचालय

हार्बरच्या चार स्थानकांवर एकही शौचालय नाही

तर मध्य रेल्वेच्या दोन स्थानकांवर एकही शौचालय नाही

कल्याण ते सीएसटी या 26 स्थानकांवर आहेत फक्त 28 शौचालयं

हार्बरच्या पनवेल ते सीएसटी या 26 स्थानकांवर आहेत फक्त 22 शौचालयं

बोरिवली ते चर्चगेट या 21 स्थानकांवर आहेत 25 शौचालयं

प्रत्येक स्थानकांवर लाखो प्रवाशांसाठी सरासरी आहे एकच शौचालय

99 टक्के शौचालय ही पैसे भरा आणि वापरा स्वरुपाचे

मुंबईतल्या या स्थानकांचं सर्वेक्षण करण्यासाठी राज्यातल्या इतर भागातल्या मुलींची निवड करण्यात आली होती. त्यांचा अनुभवही तितकाच धक्कादायक होता.

मुंबईतले लोक दररोज किमान 2-5 तास लोकलनं प्रवास करतात, त्यात प्रवासी महिलांची संख्या ही निम्मी आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी किमान स्वच्छ शौचालय असावं अशी त्यांची माफक अपेक्षा आहे.

स्वच्छ भारताचं स्वप्न... स्वच्छ रेल्वे दिल्याशिवाय पूर्ण होणं कठीण आहे. सुविधा दिल्या तर प्रवासी रेल्वे परिसराचा गैरवापर करणार नाहीत. त्यामुळे या बजेटमध्ये किमान शौचालयाची संख्या वाढवून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जावा ही मागणी जोर धरतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2016 05:35 PM IST

ताज्या बातम्या