'सूरज परमारांना पालिका अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागत होते'

  • Share this:

suraj parmar_buldierठाणे - 20 फेब्रुवारी : सूरज परमार यांना पालिकेच्या अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागत होते असा धक्कादायक खुलासा कॉसमॉस ग्रुपचे वास्तू विशारद सुवर्णा घोष यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

सुरज परमार प्रकरणातील तपासात आणखी धक्कादायक खुलासा झालाय. त्यात कॉसमॉस ग्रुप च्या वास्तू विशारद सुवर्णा घोष यांनी हा खुलासा ठाणे पोलिसांकडे केलाय. बांधकाम व्यवसायात पालिका अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतात याचा पुन्हा खुलासा सुवर्णा घोष यांनी केलाय. त्यासोबत पालिकेच्या अधिकार्‍यांना सूरज परमार यांनी पैसे दिल्याचेही कबुली चौकशी दरम्यान दिली आहे. एवढे सगळे पुरावे समोर आल्या नंतरही आजपर्यंत ठाणे पोलिसांनी ठाणे महानगर पालिकेच्या कोणत्याही अधिकार्‍यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अडवणूक केल्याबद्दल अटक केलेली नाहीय. आयकर विभागाच्या धाडीत आणि इतर ठिकाणीही सर्व सरकारी विभागांना पैसे दिल्याची नोंद सूरज परमार यांनी केलेली आहे असं असताना कोणत्याही सरकारी बाबूला अटक न होणे ही तपासतील त्रुटी दाखवत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2016 07:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading