हार्बरलाईनवर प्रवास टाळा, सीएसटी ते वडाळा वाहतूक बंद

हार्बरलाईनवर प्रवास टाळा, सीएसटी ते वडाळा वाहतूक बंद

  • Share this:

Jumbo Block213मुंबई - 20 फेब्रुवारी : मुंबईची लाईफलाईन असलेल्या हार्बर मार्गावरच्या जम्बो ब्लॉकचा आज दुसरा दिवस आहे. शुक्रवारपासून हार्बर मार्गावर 72 तासांचा जम्बोब्लॉक सुरू झाला. आज आणि उद्या वडाळा ते सीएसटी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. हार्बर मार्गावर 12 डब्यांच्या लोकल चालवता येण्यासाठी हा ब्लॉक आहे. सीएसटीमध्ये हार्बर लाईनचे दोन्ही प्लॅटफॉर्म सध्या फक्त 9 डब्यांच्या गाड्यांसाठी आहेत. वडाळा ते वाशी आणि वडाळा ते पनवेल ही वाहतूक नेहमीसारखी सुरू आहे. या दरम्यान हार्बरच्या प्रवाशांना मेन लाईनवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

का घेतला जम्बोब्लॉक

- हार्बर रेल्वेवर 12 डब्यांच्या गाड्या लवकरच

- त्यासाठी प्लॅटफॉर्म्सची लांबी वाढवणार

- रुळ हालवण्याचंही काम मोठं

- विद्युत तारा रुळांनुसार हलवणे

- सिग्नल यंत्रणेतही किरकोळ बदल

- एकूण 400 कामगार कार्यरत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2016 01:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading