रामदेव बाबांच्या 'पतंजली'ला मिहानमध्ये 355 एकर जागा, गडकरींची घोषणा

रामदेव बाबांच्या 'पतंजली'ला मिहानमध्ये 355 एकर जागा, गडकरींची घोषणा

  • Share this:

patanjali_mihanनागपूर - 19 फेब्रुवारी : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पंतजली संस्थेला नागपूरच्या मिहानमध्ये 355 एकर जागा देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी जाहीर केली आहे.

रामदेव बाबा यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी नागपुरात येऊन कायेदशीर बाबींची पुर्तता केली आहे. यासोबतच रामदेव बाबांच्या पतंजलीला नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील एमआयडीसीत 200 एकर संत्र्यांच्या प्रक्रियेसाठी जागा देण्यात येणार असल्याचं गडकरी म्हणाले. या शिवाय अमरावती येथे फुड पार्कसाठी जागा आणि गडचिरोलीत वनौषधी लागवड तसंच जमा करण्यासाठी जागा देण्यात येणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. अमेरिकेतील उद्योजक मिलिंद पिंपरीकर यांनाही सॅटेलाईट तयार करण्याच्या कंपनीसाठी 50 एकर जागा मिहानमध्ये देण्यात येणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 19, 2016, 10:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading