सरकारविरोधात काही बोलणं म्हणजे देशद्रोह, चव्हाणांचं टीकास्त्र

सरकारविरोधात काही बोलणं म्हणजे देशद्रोह, चव्हाणांचं टीकास्त्र

  • Share this:

chavan_on_modi_sarkarसांगली - 19 फेब्रुवारी : सरकारविरोधात काही बोलणं म्हणजे देशद्रोह ठरवलं जातं. लेखक, पत्रकार आणि साहित्यिकांची आत्ता मुस्कटदाबी सुरू आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केली. ते सांगलीत बोलत होते. एका महिला पत्रकाराला बलात्काराची धमकी दिली जात आहे, इतकी गंभीर परिस्थिती राज्यात आहे पण सरकारविरोधात काही बोलणं म्हणजे देशद्रोह ठरवलाय अशी टीकाही त्यांनी केली.

शिवसेना आणि भाजप युतीच भवितव्य हे मुंबई निवडणुकी नंतरच ठरणार आहे. कधीही सत्तेबाहेर पडाव लागेल, म्हणूनच शिवसेना सरकारला विरोध करत आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. आताच्या सरकार विरोधी बैठक घेतली म्हणून, मुंबईतील एका महिला पत्रकाराला बलात्काराची धमकी दिली जात आहे, इतकी गंभीर परिस्थिती राज्यात आहे, असं सांगून, अशोक चव्हाण पुढे म्हणाले, सरकार विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह ठरवलं जात आहे. लेखक, पत्रकार आणि साहित्यिकांची आत्ता मुस्कटदाबी सुरू आहे अशी टीका ही अशोक चव्हाण यानी केली.

राज्याच्या इतिहासातील सर्वात केवलवाणी मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहेत. अस सांगून, पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, निष्क्रिय भाजप सरकार विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि जनतेने रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करावा. निरढावलेल्या सरकारला आत्ता रस्त्यावरचीच भाषा समजले असं ही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. डाळीचा साठा बंदीचा निर्णय चुकीचा होता,मंत्रिमंडळाची बैठक घेतली काय ? मुख्यमंत्र्यांनी कोणालाही विश्वासात घेतलं नव्हतं. व्यापर्‍यांना हजारो कोटींचा फायदा झाला, याची चौकशी व्हावी, असं सांगून, पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, डाळीच्या साठा बंदी उठवण्याच्या निर्णयाबाबत माहिती लपवल्या बद्दल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 19, 2016, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading