शेन वॉर्नच्या डोक्याला अॅनाकोंडाने केला दंश

शेन वॉर्नच्या डोक्याला अॅनाकोंडाने केला दंश

  • Share this:

shenewarn18 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्न याला एका रिऍलिटी शोच्या दरम्यान डोक्यावर ऍनाकोंडाने दंश मारला. पण, सुदैवाने तो साप विषारी नसल्यामुळे तो थोडक्यात बचावला.

न्यूज डॉट कॉम च्या रिपोर्ट नुसार शेन वॉर्नसोबत 'आय एम अ सेलिब्रिटी..गेट मी आऊट हियर' या कार्यक्रमामध्ये हा प्रकार घडला. हा कार्यक्रम नेटवर्क टेनवर प्रसारित होतो. या कार्यक्रमात शेन वॉर्न एक टास्क करत होता. वॉर्नने आधी आफ्रिकन विंचु,झुरळ आणि उंदरांच्या बॉक्सच्या मधून हुशारीने बाहेर पडला होता. त्यानंतर वॉर्नला सापांचा बॉक्स दिला गेला. डॉक्टर क्रिस ब्राऊन यांनी वॉर्न ला चेतावनी दिली होती की, त्याच्या त्वचेवर असलेल्या उंदरांच्या गंधामुळे साप त्याला आपलं भक्ष समजू शकतो. पण, शेनने डोकं त्या बॉक्समध्ये घुसवलं आणि एका ऍनाकोंडाने त्याला दंश केला. त्याने तातडीने डोकं बाहेर काढलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

कार्यक्रमाचे कार्यकारी प्रोड्युसर स्टीफन टेटें म्हणाले की, शेनने आधीच म्हटले होते की, त्याला सर्वात जास्त भीती ही सापांची वाटते,आणि सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे सापाच्या दंशानंतरही त्याने दिलेली टास्क पूर्ण केला.

नेटवर्क टेनच्या प्रवक्ताने म्हटलंय की, बॉक्समध्ये ऍनाकोंडा,कार्न स्नेक आणि रेट स्नेक होते. पण ज्या ऍनाकोंडाने दंश मारला तो विषारी नव्हता.ऍनाकोंडाच्या जबड्यात पुढच्या बाजूला 100 दात असता. त्याच्या दंशामुळे 100 सुईंएवढा प्रभाव असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 18, 2016, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading