शेतकर्‍यांच्या आत्महत्या फॅशन आणि ट्रेंड झालाय - गोपाळ शेट्टी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2017 09:04 PM IST

शेतकर्‍यांच्या आत्महत्या फॅशन आणि ट्रेंड झालाय - गोपाळ शेट्टी

Gopal Shetty231

मुंबई – 18 फेब्रुवारी : हल्ली शेतकर्‍यांना मदत करणं ही एक फॅशन बनली आहे, असं विधान करून भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. सगळ्याच आत्महत्या या बेरोजगारी किंवा उपासमारीमुळे होत नसल्याचेही त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितलं.

येत्या काही वर्षात दुष्काळाचा प्रश्न मार्गी लागेल. अशाप्रकारचे बदल हे एका रात्रीत घडत नाही. सध्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात येणारी मदत राजकारणाचा मुद्दा बनला आहे. मी त्याच्या जास्त खोलात जाऊ इच्छित नाही. मात्र, शेतकर्‍यांच्या आत्महत्या किंवा त्यांना मदत करणं हल्ली फॅशन बनली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यावरून राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचंही गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2016 01:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...