'पाणी आडवा, पाणी जिरवा' आमिर देणार नारा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2016 08:13 PM IST

'पाणी आडवा, पाणी जिरवा' आमिर देणार नारा

amir_khan_pc34मुंबई - 17 फ्रेबुवारी : दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून 'पाणी आडवा, पाणी जिरवा' असा नारा देत अभिनेता आमिर खान यांच्यासह 'सत्यमेव जयते'ची टीम आणि उद्योगपती मैदानात उतरले आहे. पाणी वाचवण्यासाठी एकत्र या असं आवाहन यावेळी आमिर खानने केलंय.

जलसंधारणासाठी आता 'पाणी फाऊंडेशन'च्यावतीनं मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाण्यासाठी अनेक उद्योगपती आणि अभिनेते आता मैदानात उतरले आहे. राज्यातल्या जलसंधारणाच्या कामात आता 'सत्यमेव जयते'ची टीम सरकारला मदत करणार आहे. त्याबाबत आज सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अभिनेता आमिर खाननं याबाबतची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाची मोहिम हाती घेतली असून ती राज्याच्या हितासाठी आहे. आपण त्यामध्ये सहभागी व्हावं असा आग्रह त्यांनी केला होता. पाणी वाचवण्यासाठी आता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन यावेळी आमिर खानने केलं. त्यांच्यासोबत याच पत्रकार परिषदेत आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमारमंगलम् बिर्ला, बजाज ग्रुपचे राजीव बजाज, भारज फोर्जचे अमित कल्याणी आणि दिग्दर्शक राजू हिरानी उपस्थित होते. त्यांच्यासोबतच सत्यमेव जयतेचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ हेही हजर होते.

सत्यजित भटकळ यांनी या सगळ्या कामा मागची भूमिका विशद केली. उपस्थित प्रत्येक उद्योगपतींनी जलसंधारणाच्या कामाबाबतच्या त्यांच्या सहभागाबाबतच उपस्थितांना माहिती दिली. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून ही कामं केली जाणार आहेत. या पाणी फाऊंडेशनच्या कामात रिलायन्स ग्रुपच्यावतीनं मुकेश अंबानींनीही आपलं म्हणणं मांडलं, तर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंही पाणी फाऊंडेशबाबतच त्याचं म्हणणं मांडलं. यावेळी सातारा जिल्ह्यातल्या अजिंक्यतारा इथं केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा माहितीपटही दाखवण्यात आला. त्यानुसारच राज्यात पाणी साठवण्यासाठी म्हणून विविध कामं करण्यासाठी म्हणून पाणी फाऊंडेशनच्या वतीने ही कामं केली जाणार आहेत.

या कार्यक्रमात रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. जलसंवर्धनासाठी पाणी फाऊंडेशननं घेतलेल्या पुढाकाराचं त्यांनी कौतुक केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2016 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...