News18 Lokmat

पेणवासीयांची संघर्ष यात्रा यशस्वी, हेटवणे धरणाचं पाणी पेणला मिळणार !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2016 05:09 PM IST

पेणवासीयांची संघर्ष यात्रा यशस्वी, हेटवणे धरणाचं पाणी पेणला मिळणार !

पेण - 17 फेब्रुवारी : हेटवणी धरण्याचं पाणी शेतीला द्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मान्यता दिलीय. आमदार धैर्यशील पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आज यासंदर्भात सविस्तर चर्चा देखील झाली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. त्यासाठी हेटवणे ते शहापाडा अशी 17 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. एमएमआरडीएतून 40 कोटींची तरतूद केली जाणार आहे.

शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात पेण ते मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला असा पायी मोर्चा काढण्यात आला होता.आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ भेटलं. त्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पाण्याची मागणी मान्य केली आणि ही बातमी समजताच आंदोलकांनी एकचं जल्लोष केला मुंबईतील गोवंडी येथील कृष्ण सभागृहात जवळ पास दीड ते दोन हजार आंदोलक मोर्चेकरी थांबले होते. पाणी घेतल्या शिवाय आम्ही जाणार नाही असा पवित्रा आंदोलककर्त्यांनी घेतला होता. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. हेटवणी धरण्याचं पाणी शेतीला द्यायला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलीये. आंदोलन यशस्वी झाल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2016 05:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...