दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी हत्येमागे एकच मास्टरमाइंड !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2016 05:26 PM IST

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी हत्येमागे एकच मास्टरमाइंड !

dabholkar,pansare, kalburgiपुणे - 17 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरण, नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण आणि कर्नाकटचे साहित्यिक एम.एम. कलबुर्गी या तिन्ही हत्यांमागे एकच मास्टरमाइंड असल्याचा कयास तपास यंत्रणांना आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कर्नाटकचे विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणार्‍या सीआयडी टीमची सयुक्त बैठक आज पुण्यात पार पडली. पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तिन्ही गुन्ह्याचा तपास करण्या अधिकार्‍यांची अशा प्रकारे पहिल्यांदाच सयुक्त बैठक घेण्यात आली. दाभोलकर, पानसरे आणि कलबुगच् यांच्या हत्येचा तपास करणारे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या गुन्ह्यात असलेले साम्य आणि गुन्हायचा मुख्य सूत्रधार एकच आहे का या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसंच तिन्ही टीमच्या तपासात कुठपर्यंत प्रगती झाली याचा देखील सयुक्त आढावा या वेळी या बैठकीत घेण्यात आला.

दाभोलकर, पानसरे यांची हत्या करण्याची पद्धत एक सारखीच आहे. दाभोलकर आणि पानसरे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असतांना अज्ञातांनी गोळा झाडून हत्या केली. तर कलबुर्गी यांच्या हत्याही याच प्रकारे झाली. एवढंच नाहीतर दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची कार्यपद्धतीचा एकच धागा आहे. दाभोलकर आणि पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेवर पहिल्यापासून संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सनातनच्या साधकांनाही ताब्यात घेण्यात आलंय. बेपत्ता असलेला सनातनाचा साधक रुद्र गौडा पाटील तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. नेपाळसह देशात रूद्रचा कसुन शोध सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2016 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...