IBN लोकमतचा दणका, चारा छावण्या सुरूच राहणार !

IBN लोकमतचा दणका, चारा छावण्या सुरूच राहणार !

  • Share this:

chara_chavani_impcat16 फेब्रुवारी : मराठवाडा दुष्काळाने होरपळत असतांना राज्य सरकारने 3 जिल्ह्यांमध्ये चारा छावणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्यानंतर चारा छावण्या बंद करण्यात येणार नाही असं स्पष्टीकरण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलंय. तसंच मराठवाड्यातला एकही जनावर मरू देणार नाही, असं आश्वासनही त्यांनी आयबीएन-लोकमतच्या बेधडक या कार्यक्रमात बोलताना दिलं.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आधीच पाणीटंचाईचं संकट असतांना राज्य सरकारने उस्मानाबाद, लातूर, बीडमधील चारा छावण्या मे 2016 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली. या चारा छावण्यांमध्ये मे महिन्यांपर्यंत चारा उपलब्ध आहे. त्यामुळे या चारा छावण्या बंद करण्याची कारवाई करावी असं पत्र महसूल उपसचिव अशोक आत्राम यांनी जिल्हाधिकार्‍यांना लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे चारा असल्याचा उल्लेख करत छावण्या बंद करण्याचे आदेश दिले. जर हा निर्णय झाला तर बीडमधील 163, लातूरमधील 6 आणि उस्मानाबादेतील 77 चारा छावण्या बंद होतील. या प्रकरणाला आयबीएन लोकमतने वाचा फोडल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं.

कोणत्याही चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. ज्या काही चारा छावण्या बंद करण्याची सुचना देण्यात आली आहे. तसं काहीही होणार नाहीये. ज्या तात्पुरत्या चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णय घेतलाय त्याही सुरू राहतील असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना दिलं.

दरम्यान, चारा छावण्या बंद प्रकरणाची मुंबई हायकोर्टाने याचिका दाखल करून घेत चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला असा सवाल राज्य सरकारला विचारला होता. या प्रकरणाचं स्पष्टीकरण देण्याचे निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. तर दुसरीकडे शिसवेनेनंही आक्रमक होतं शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. अखेरीस राज्य सरकारने आपला तुघलकी निर्णय मागे चारा छावण्या सुरूच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 16, 2016, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading