चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय का ?, हायकोर्टाचा सरकारला सवाल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2016 04:45 PM IST

चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय का ?, हायकोर्टाचा सरकारला सवाल

court_on_chara_Chavani16 फेब्रुवारी : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात जनावरांचा घास हिरावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयाची दखल घेत मुंबई हायकोर्टाने स्वत:हुन याचिका दाखल केली असून चारा छावणी बंद करण्याचा निर्णय कशासाठी घेण्यात आला अशी विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारकडे केली आहे. याबद्दल आता राज्य सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

उस्मानाबाद, लातूर, बीडमधील चारा छावण्या मे 2016 पर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या चारा छावण्यांमध्ये मे महिन्यांपर्यंत चारा उपलब्ध आहे. त्यामुळे या चारा छावण्या बंद करण्याची कारवाई करावी असं पत्र महसूल उपसचिव अशोक आत्राम यांनी बीड, उस्मानाबाद आणि लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे चारा असल्याचा उल्लेख करत छावण्या बंद करण्याचे आदेश दिले आहे. जर हा निर्णय झाला तर बीडमधील 163, लातूरमधील 6 आणि उस्मानाबादेतील 77 चारा छावण्या बंद होतील. चारा छावण्या बंदी प्रकरणी हायकोर्टाने दखल घेतलीये. हाय कोर्टाने याविषयी राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय का घेतला असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा आयबीएन लोकमतनं केला होता. आज हायकोर्टाने या प्रकरणी स्वत:हुन याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना आंदोलन करणार आहेत. उस्मानाबादेत शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सत्तेतून बाहेर पडण्यासाठी विनंती करण्यात येईल आणि शासनाने चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास आज रात्रीपासून तीव्र आंदोलन करण्यार असल्याचं शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2016 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...