'मेक इन युती', खांद्याला खांदा लावून काम करण्याची सेनेची ग्वाही

'मेक इन युती', खांद्याला खांदा लावून काम करण्याची सेनेची ग्वाही

  • Share this:

मुंबई - 15 फेब्रुवारी : मुंबई-महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं कराल त्यामध्ये शिवसेना आणि प्रत्येक शिवसैनिक तुमच्या खाद्यांला खांदा लावून उभा राहील, अशी ग्वाही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली. मेक इन इंडियाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.uddhav_cm_selfy_new_image

शिवसेना आणि भाजपमध्ये आजपर्यंत या ना त्या कारणाने अनेक वेळा धुसफूस चव्हाट्यावर आली. एवढंच काय तर 'मेक इन इंडिया' कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना व्यासपीठावर स्थान न देण्यात आल्यामुळे सेनेनं नाराजी व्यक्त केली होती. पण, आज 'मेक इन इंडिया'कार्यक्रमात सेना-भाजपमध्ये 'सबकुछ ठिक' आहे असा संदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत सेल्फीही काढून युतीची झलक दिली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

तसंच मुंबई - महाराष्ट्रासाठी जे काय चांगलं कराल त्यामध्ये शिवसेना आणि प्रत्येक शिवसैनिक तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. मुंबईतील वाढती लोकसंख्या हा माझा आजचा विषय नाही मात्र याबाबत ही विचार आणि संशोधन झालं पाहिजे. विकास सर्वांगीण झाला पाहिजे. मुंबई सोबत महाराष्ट्राचा आणि त्यासोबत देशाचा विकास झाला पाहिजे. आपली बरीचशी स्वप्न उद्याच्या अर्थसंकल्पात मांडली जाणार आहेत. जोपर्यंत रक्त सांडण्याची वेळ येत नाही तोपर्यंत घाम गाळा आणि इतका घाम गाळा, मेहनत करा आणि मजबूत व्हा की रक्त सांडण्याची वेळ येणार नाही. कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 15, 2016, 10:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading