राज्य सरकारने हिरावला मुक्या जनावरांचा घास !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2016 09:38 PM IST

solapur chara scamबीड - 15 फेब्रुवारी : दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाड्यावर आता पाणीटंचाईचं सावट आहे. दुष्काळी परिस्थितीला तोंड देणार्‍या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळत राज्य सरकारने मुक्या जनावरांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीडमधील चारा छावण्या मे 2016 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

उस्मानाबाद, लातूर, बीडमधील चारा छावण्यांमध्ये मे महिन्यांपर्यंत चारा उपलब्ध आहे. त्यामुळे या चारा छावण्या बंद करण्याची कारवाई करावी असं पत्र महसूल उपसचिव अशोक आत्राम यांनी बीड, उस्मानाबाद आणि लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे चारा असल्याचा उल्लेख करत छावण्या बंद करण्याचे आदेश दिले आहे. तसंच मे महिन्यात आढावा घेऊन आवश्यकता असल्यास चारा छावण्या चालू करण्याबाबत प्रस्ताव पाठवा अशी सुचनाही केलीये. रब्बी हंगामात उपलब्ध झालेला चारा जिल्ह्यामध्ये उपलब्ध होईल तो सर्वत्र पोहचेल आणि जनावरं यापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी जिल्ह्याधिकार्‍यांची असेल असा शेराही मारण्यात आलाय. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली असून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवालच विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विचारलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2016 08:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...