सातार्‍यात सहलीच्या बसला अपघात; 3 ठार, 22 जखमी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2016 02:37 PM IST

सातार्‍यात सहलीच्या बसला अपघात; 3 ठार, 22 जखमी

accident2

सातारा - 14 फेब्रुवारी : पुणे-बंगळूरू महामार्गावर विद्यार्थ्यांच्या खासगी बसची ऊसाची वाहतूक करणार्‍या ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर 22 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींवर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

श्रीगोंदा इथल्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेश इंजिनिअरींग कॉलेजचे विद्यार्थी सहलीसाठी खासगी बसने गोव्याला गेले होते. तिथून परतत असताना सातार्‍याजवळ तासवडे टोलनाक्याजवळ या बसची ट्रक्टरला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात बसचा दर्शनी भाग एका बाजुने कापला गेला. त्यामुळे पुढच्या बाजुला बसलेला अभिजीत पंडीत पेठकर या विद्यार्थ्यासह शिपाई सुर्यकांत सुदाम कानडे आणि बसचा क्लिनर प्रकाश बसवराज बिराजदार या तिघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.

तर या अपघातात 22 जण जखमी झाले असून, त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2016 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...