पालघर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 13, 2016 09:07 PM IST

568voting_in_mumbaiपालघर - 13 फेब्रुवारी : पालघर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. दिवसभरात 62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मंगळवारी 16 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनाने ही जागा रिकामी झाली होती. कृष्णा घोडा यांचेच पुत्र अमित घोडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित मैदानात आहे. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा उमेदवारही रिंगणात आहे. मात्र, खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच असल्याचं चित्र आहे. मतदानासाठी आज चोख पोलीस बदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2016 09:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...