कुपवाडामध्ये दहशतवाद्यांशी लढतांना नाशिकचे वीरपुत्र शंकर शिंदे शहीद

कुपवाडामध्ये दहशतवाद्यांशी लढतांना नाशिकचे वीरपुत्र शंकर शिंदे शहीद

  • Share this:

नाशिक - 13 फेब्रुवारी : वीरजवान हणमंथप्पा यांना अखेरची सलामी देऊन काही तास उलटले नाही ते आज आणखी एका महाराष्ट्राच्या वीरजवानांना सीमेवर वीरमरण आलंय. जम्मू-काश्मीरजवळच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी सामना करतांना दोन जवान शहीद झाले आहे. यामध्ये चांदवडचा वीरपुत्र शंकर शिंदे यांचा समावेश आहे. विजापूरचे सहदेव मारुती मोरे शहीद झाले आहे.

javan_shaheed3शंकर शिंदे चांदवड तालुक्याच्या बायले गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या मागे पत्नी सुवर्णा, सहा वर्षाची मुलगी, दीड वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या बातमीनंतर बायले गावात शोककळा पसरली आहे. झुनरेशी गावात चार अतिरेकी घुसल्याची बातमी जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी झुनरेशी गावात सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी अतिरेक्यांसोबत धुमश्चक्री सुरु झाली. यादरम्यान, नायक शंकर शिंदे आणि सहदेव मोरे गोळी लागल्याने ते धारातीर्थी पडले. सर्च ऑपरेशन दरम्यान जवान अतिरेक्यांचा शोध घेत आहेत. परंतु, या चकमकीत 5 दहशतवादी ठार मारण्यात जवानांना यश आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 13, 2016, 8:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading