कसाबच्या हातातील गंडा-धाग्याचा हेडलीने केला खुलासा

कसाबच्या हातातील गंडा-धाग्याचा हेडलीने केला खुलासा

  • Share this:

Kasab temple dhaaga

मुंबई - 12 फेब्रुवारी : डेव्हिड हेडलीनं आजच्या आपल्या साक्षीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अजमल कसाबचा फोटो हेडलीला दाखवल्यानंतर त्याने कसाबला ओळखलं. कसाब पकडला गेल्यामुळे लष्कराचे सगळे जण दु:खी होते, असं हेडलीने सांगितलं. त्यासोबतच भारतात 10 ही अतिरेक्यांचा प्रवेश सोपा व्हावा यासाठी हेडलीने दादरच्या सिद्धिविनायक मंदिरातून 15-20 गंडे-धागे विकत घेतलं होते.

'मी सिद्धीविनायक मंदिराचीही रेकीही केली होती. तसंच तिथलं व्हिडिओ शूटींगही केलं होतं. सिद्धीविनायक मंदिरातून आपण काही पिवळ्या आणि लाल रंगाचे धागे विकत घेतले होते. पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर आपण साजीद मीरला ते धागे दिले होते. हे धागे अतिरेक्यांना बांधण्यास सांगितलं होतं. जेणेकरुन अतिरेकी पाकिस्तानी नसल्याचं वाटेल. माझी ही कल्पना साजीदला फारच आवडली होती. त्यानं दहाही अतिरेक्यांना हे धागे बांधलेही होते,' असा खुलासा हेडलीनं आजच्या साक्षीत केला. त्यातलाच हा लाल गंडा आपल्याला कसाबच्या मनगटावर आपल्याला बघायला मिळाला होता.

26/11 हल्ल्यादरम्यान कसाबचा हातात गंडा घातलेला फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यातलाच हा लाल गंडा आपल्याला कसाबच्या मनगटावर आपल्याला बघायला मिळाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 12, 2016, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading