शिवसेना भवनही लष्कर-ए-तोयबाच्या होतं रडारवर, हेडलीचा खुलासा

शिवसेना भवनही लष्कर-ए-तोयबाच्या होतं रडारवर, हेडलीचा खुलासा

  • Share this:

headley_shivsena_bhavanमुंबई - 12 फेब्रुवारी : शिवसेना भवन लष्कर-ए-तोयबाच्या रडारवर होतं आणि यासाठी शिवसेना भवनाची रेकी करायची होती असा खळबळजनक खुलासा डेव्हिड कोलमन हेडलीने केलाय. याकामासाठी त्याने राजाराम रेगे या शिवसैनिकासोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्नही केला होता असा खुलासाही त्याने केला आहे. याआधीही हेडलीने एनआयला शिवसेना भवन रडारवर होतं अशी माहिती दिली होती.

26/11च्या दहशतवादी हल्ल्यातला प्रमुख आरोपींपैकी एक असलेला डेव्हिड कोलमन हेडलीची सध्या मुंबई कोर्टासमोर त्याची साक्ष सुरू आहे. त्यामध्ये तो अनेक खळबळजनक खुलासे करतोय. आज त्यानं आणखी एक खुलाशाचा पुनरुच्चार केला. त्यानं दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना भवन लष्कर-ए-तोयबाच्या रडारवर होतं. त्यामुळे त्याला शिवसेना भवनाची टेहळणी करण्यासाठी प्रत्यक्ष इमारतीमध्ये जाण्यात रस होता. त्यासाठी त्यानं राजाराम रेगे या शिवसैनिकाला भेटल्याची आणि त्याच्याशी मैत्री वाढवायला सुरुवात केल्याची कबुली दिली आहे. इतकंच नाही तर राजाराम रेगेला शिवसेना भवनामध्ये भेटल्याचं हेडलीनं सांगितलंय. 4 वर्षांपूर्वी एनआयएच्या पथकानं अमेरिकेत हेडलीची चौकशी केली होती, तेव्हाही त्यानं ही माहिती दिली होती. हेडलीने साक्षीदरम्यान, शिवसेनेच्या राजाराम रेगेला भेटल्याचं म्हटलंय. राजाराम रेगे यांनी आपल्या उद्धव ठाकरे यांचा प्रसिद्धी प्रमुख असल्याचं सांगितलं होतं असंही त्याने सांगितलं. मात्र, राजाराम रेगेचा शिवसेनेसोबत कोणताही संबंध नव्हता असं सांगितलंय.

राजाराम रेगे नेमका कोण आहे ?

रेगे, रेकी आणि हेडली

राजाराम रेगे दादर -माहीम परिसरात राहायचा

पण आता नेमका कुठे ? हे माहित नाही

सेना भवनातच रेगेची भेट झाल्याचा हेडलीचा दावा

रेगेनं, उद्धव ठाकरेंचे प्रसिद्धी प्रमुख असल्याचं सांगितलं

सेनेकडून मात्र, रेगे हा शिवसैनिक नसल्याचा खुलासा

राजाराम रेगेसोबत हेडलीला मैत्री वाढवायची होती

हेडलीला सेनाभवनाची रेकी करायची होती

रेकीसाठीच हेडलीने रेगेशी जवळीक साधली

साजिदच्या सांगण्यावरून हेडली रेगेंना भेटला

मुंबई विमानतळावर हल्ला करता आला नाही - हेडली

दरम्यान, 26 / 11 च्या हल्यात मुंबई विमानतळ निवडता न आल्यामुळे लष्करचा म्होरक्या नाराज होता. 9 ते 15 एप्रिल 2008 ला मुंबईत रेकी केली. मुंबईची रेकी करताना गेट वे ऑफ इंडिया, कफ परेड आणि वरळी या तीन ठिकाणी उतरण्याची योजना होती. पाकिस्तानला परत गेल्यानंतर साजीद मीर मेजर इक्बाल यांना सगळे व्हिडिओ दाखवले होते. लख्वीला सिद्धीविनायक मंदिर, नेव्हल स्टेशन्स मुंबई एअरपोर्ट अशा ठिकाणांवर हल्ला करायचा होता. पण ही ठिकाणं निवडता न आल्यानं लख्वी नाराज झाला होता असा खुलासाही त्याने केलाय.

तसंच हल्ल्यात छाबडा हाऊसची निवड करण्यात आली होती. कारण येथे ज्यू आणि इस्त्राईली नागरीक राहतात. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रख्यात आहे. हल्ल्याच्या वेळी कुणी ओळखू नये म्हणून सिद्धिविनायक मंदिरातून10 अतिरेक्यांना हातात बांधण्यासाठी धागा घेतला होता. त्याचबरोबर बीएआरसी इथं रेकी करण्यात आली होती. बीएआरसीचे देखील व्हिडिओ काढण्यात आले होते. सिद्धिविनायक मंदिर आणि नेव्हल एअर स्टेशनची हल्ल्यासाठी रेकी करण्यात आली होती मात्र येथे कडक सुरक्षा असल्यामुळे हल्ला करता आला नाही असं हेडली म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 12, 2016, 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading