ठाणे - 12 फेब्रुवारी : बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ठाणे सह पोलीस आयुक्त आशुतोष डूमरे यांनी तपास कामासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या टीममध्ये 1 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 2 एसीपी 3 पोलीस निरीक्षक आणि 3 पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.
7 ऑक्टोबरला सूरज परमार यांनी आपल्या कार्यालयात आत्महत्या केली होती. परमार यांनी आपल्या डायरीमध्ये चार नगरसेवकांचा उल्लेख केला होता. तसंच अनेक धक्कादायक खुलासेही त्यांना आपल्या डायरीमध्ये केले होते. त्यांनी डायरीत केलेल्या उल्लेखानंतर चारही नगरसेवकांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे ठाण्यातलं राजकारण ढवळून निघालं होतं. आता या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv