राज्यातील 66 सिंचन प्रकल्पांची नव्याने होणार चौकशी

  • Share this:

Babli dam maharashtra photo DC_0_0

औरंगाबाद - 11 फेब्रुवारी : राज्यातील 66 जलसिंचन प्रकल्पांची नव्या चौकशी होणार आहे. यामध्ये नाशिकमधील किकवी आणि अकोल्यातील कांचनपूरा लघू सिंचन प्रकल्पाची विषेश चौकशी होणार आहे.

अयिमीतता असल्याने हे सर्व प्रकल्प कोर्टाने रद्द केले होते. मात्र हे प्रकल्प सुरू होण्यापुर्वीच कंत्राटदारांना ऍडवान्स रक्कम देण्यात आली होती. औरंगाबाद खंडपीठाने एक जनहित याचिकेवर सुनावणी करतांना या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यासाठी बुधवारी सरकारने 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. 3 महिन्याच्या आत ही समिती आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करणार आहे.

66 सिंचन प्रकल्पांची नव्यानं चौकशी - चौकशी समिती स्थापन

- 66 प्रकल्पाचं कामच सुरू झालं नाही

Loading...

- मराठवाड्यातील 10 तर विदर्भातील 56 प्रकल्प

- काम सुरू होण्याअगोदरच कंत्राटदारांना ऍडव्हान्स

- अकोल्यातील कांचनपुरा लघुप्रकल्प आणि

- नाशिकच्या किकवी प्रकल्पाची विशेष चौकशी

- योग्य मंजुरी नसल्यामुळे सर्व प्रकल्प कोर्टानं केले रद्द

सिंचन प्रकल्पातील गौडबंगाल - काय होणार चौकशी?

- 66 प्रकल्पांना मंजुरी देताना नियमांचं उल्लंघन

- बांधकाम सुरू न होता कंत्राटदारांना ऍडव्हान्स कशाला?

- कांचनपुरा, किकवी या प्रकल्पांना घाईघाईनं मंजुरी का?

- जलआराखडा तयार नसतानाही प्रकल्पांना मान्यता

- मान्यता देताना पर्यावरण नियमांचं उल्लंघन

- 3 महिन्यांच्या आत समिती सादर करणार अहवाल

सिंचन प्रकल्पाची चौकशी समिती - चौकशी समितीचे सदस्य

रा. वा. पानसे, मुख्य अभियंता, जलविद्युत प्रकल्प - अध्यक्ष

अ. स. ननवरे, मुख्य अभियंता, जलसंपत्ती विकास केंद्र

खलिल अन्सारी, मुख्य अभियंता, जलसंपदा कोकण विभाग

च. ना. माळी, अधीक्षक अभियंता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2016 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...