बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर कानडी सक्ती, ही असहिष्णुता नाही का? -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2016 11:18 AM IST

Uddhav2312मुंबई - 09 फेब्रुवारी : बेळगावसारख्या सीमाप्रश्नात अडकलेल्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर कानडी भाषेची सक्ती केली जाते. कोणत्याही भाषेला आपला विरोध नाही. पण मातृभाषा शिकवू न देता कानडी भाषेची जबरदस्ती करणे, ही असहिष्णुता नाही का ? असा खरमरीत सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारलाय.

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र कृती समिती मनोरंजन मैदानाचं उद्घाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. सरकार कुठलंही असो. या भागात राहाणार्‍या मराठी बांधवांवरचे अन्याय काही थांबत नाहीत. सीमाभागात कानडी भाषेच्या सक्तीवर उद्धव ठाकरे बरसले.

बेळगावसारख्या सीमाप्रश्नात अडकलेल्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर कानडी भाषेची सक्ती केली जाते. कोणत्याही भाषेला आपला विरोध नाही. पण मातृभाषा शिकवू न देता कानडी भाषेची जबरदस्ती करणे, ही असहिष्णुता नाही का ? असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. त्याच बरोबर सीमा प्रश्नावर आधारित मराठी टायगर्स हा चित्रपट पाहाण्याचं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं.

बृहन्मुंबई महापालिकेतर्फे नायगांव इथल्या बॉम्बे डाईंग भूखंडावर `बेळगांव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती मनोरंजन मैदान` विकसित करण्यात आलंय. नायगांव येथे सुमारे 8.15 एकर क्षेत्रावरील बॉम्बे डाइंग भुखंडावर विकसित करण्यात आले असून महापालिकेचे उद्यान हे अनेकविध वैशिष्ट्यांनी नटलेले आहे.

मुंबईतील सर्वांत मोठ्या उद्यानांमध्ये त्याची गणना होणार आहे. मुख्यत्वे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रतिकात्मक संकल्पना उद्यान (थीम गार्डन) तसंच स्मृतीस्तंभ, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा व आसन व्यवस्था, झेन (जपानी) उद्यान, जॉगिंग ट्रॅक, रॉक गार्डन, कलात्मक हिरवळ आणि हिरवळीच्या लहान टेकड्या, छोट्या असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2016 11:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close