'आधी दोन प्रयत्न फसले पण 26/11 'साब'च्या आदेशावरुनच !'

'आधी दोन प्रयत्न फसले पण 26/11 'साब'च्या आदेशावरुनच !'

  • Share this:

// ]]>

DavidColemanHeadleyमुंबई - 08 फेब्रुवारी - मी, लष्कर ए तोयबाचा निष्ठावान सदस्य आहे. 26/11च्या हल्ल्याआधी मुंबईवर हल्ल्याचे 2 प्रयत्न फसले.

सप्टेंबर 2008मध्ये कराचीहून निघालेली बोट बिघडल्यानं पहिला प्रयत्न फसला तर ऑक्टोबर 2008मध्ये दुसरा प्रयत्नही फसला असा धक्कादायक गौप्यस्फोट डेव्हिड हेडलीने केलाय. तसंच त्याने 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला ओळखले असून त्यांच्या आदेशावरुन आपण भारतात रेकी करण्यासाठी आलो असल्याचं कबूल केलंय. त्याने पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेचा सहभाग होता हे ही मान्य केलं. हेडलीच्या कबुली जबाबवरुन 26/11 हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय. उद्याही हेडलीची साक्ष नोंदवली जाणार आहे.

26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला महत्त्वाचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईच्या मोक्का कोर्टात साक्ष सुरू आहे. डेव्हिड सध्या अमेरिकेच्या तुरुंगात 35 वर्षांची शिक्षा भोगत आहे. तिथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही साक्ष नोंदवली जात आहे. आज सकाळी साडेसात वाजेपासून साक्ष नोंदवण्यास सुरुवात झाली. आपण कोणतंही चुकीचं काम केलं नाही अशा अविभार्वात हेडलीने आपल्या काळ्या कृत्याची कबुली दिली. विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी हेडलींला बोलतं करण्यासाठी 47 हुन अधिक प्रश्न विचारले. त्या प्रश्नाची हेडलीने जी उत्तर दिली त्यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली.

मुंबई हल्ल्याच्या आधी तो 7 वेळा भारतात रेकी करण्यासाठी आला होता. हल्ल्याच्या नंतर तो पुन्हा एकदा भारतात आला होता. भारतात येताना प्रत्येक वेळा मी एअरपोर्ट आणि इतर ठिकाणी वेगवेगळी खोटी माहिती दिली. भारतात येऊन एखादा उद्योगधंदा सुरू करायचा माझा मानस होता आणि त्यासाठीच मी दाऊद गिलानी हे माझं नाव बदलून डेव्हिड हेडली केलं. मी लष्कर ए तोयबाचा निष्ठावान सदस्य होतो. लष्कर ए तोयबाच्या अतिशय महत्त्वाचा दहशतवादी साजीद मिर याचा उल्लेख त्यानं माझा सहकारी, असा केला. तसंच त्याने हाफीज सईदचा फोटो ओळखला. त्याला आपण 'साब' म्हणतो असंही तो म्हणाला. आपण 2002 मध्ये लष्कर ए तोयबामध्ये सहभागी झालो होतो. लष्कर-ए-तोयबामध्ये भरती झाल्यानंतर हेडलीनं मुझफ्फराबादमध्ये एके 47 चालवण्याचं आणि रेकी करण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर आपण 8 वेळा भारतात आलो. प्रत्येक वेळा - व्हिसासाठी जन्मतारीख, जन्मस्थान, इतर तपशील चुकीची दिली. पासपोर्टवरचं सय्यद दाऊद गिलानी हे नाव बदलून घेतलं आणि ताज हॉटेलमध्ये डेव्हिड हेडली या नावाने राहिलो. तिथे केलेल्या रेकीचा व्हिडिओ लष्कर ए तोयबाला दिली. मुंबईसह दिल्लीतही रेकी केली.

26/11 चा हल्ला आधीच घडला असता

मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याआधी मुंबईवर हल्ल्याचे 2 प्रयत्न केले गेले होते पण ते फसले. सप्टेंबर 2008 मध्ये कराचीहून निघालेली बोट बिघडल्यानं पहिला प्रयत्न फसला. ही बोट एका खडकावर आदळी त्यामुळे दारूगोळा समुद्रात बुडाला आणि हा हल्ला फसला. ऑक्टोबर 2008मध्ये दुसरा प्रयत्न केला होता. पण तोही फसला. अखेर नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ला यशस्वी झाला. या हल्ल्यात जे 10 दहशतवादी होते तेच दहशतवादी आधीच्या दोन्हीही हल्ल्यात सहभागी होते असा गौप्यस्फोट हेडलीने केला.

डेव्हिड हेडलीनं कोर्टाला काय माहिती दिली ?

- 26/11च्या हल्ल्याआधी मुंबईवर हल्ल्याचे 2 प्रयत्न फसले

- सप्टेंबर 2008मध्ये कराचीहून निघालेली बोट बिघडल्यानं पहिला प्रयत्न फसला

- ऑक्टोबर 2008मध्ये दुसरा प्रयत्न फसला

- नोव्हेंबर 2008मध्ये हल्ला केलेले 10 दहशतवादीच आधी दोन वेळा मुंबईवर हल्ला करणार होते

- डेव्हिड हेडलीनं हाफीज सईदचा फोटो ओळखला

- हेडलीनं हाफीजचा उल्लेख 'साब' म्हणून केला

- हेडली 2002मध्ये लष्कर-ए-तोयबामध्ये भरती झाला

- लष्कर-ए-तोयबामध्ये भरती झाल्यानंतर हेडलीनं मुझफ्फराबादमध्ये प्रशिक्षण घेतलं

- लष्कर-ए-तोयबाचा मेजर इक्बाल हेडलीच्या संपर्कात होता

- हेडली मेजर इक्बालला अली नावाच्या व्यक्तीच्या ओळखीतून भेटला

- अलीनं हेडलीला अफगाणिस्तानच्या सीमेवर अटक केली होती

- त्यावेळी हेडली पाकिस्तानचा निवृत्त मेजर अब्दुर पाशाबरोबर होता

- आपण भारतात जाणार असल्याची माहिती हेडलीनं तेव्हा अलीला दिली

- भारतामध्ये व्यवसाय उभारल्याची माहितीही हेडलीनं अलीला दिली

- हेडली गुप्तचर माहितीसाठी पाकिस्तानसाठी फायद्याचा ठरेल असं मत अलीनं व्यक्त केलं

- अली हा खैबर रायफल सेंटर रेजिमेंटशी संबंधित होता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 8, 2016, 1:16 PM IST

ताज्या बातम्या