S M L

IBN लोकमतचा दणका, चंद्रकांत पाटलांच्या गाडीची 'ती' नंबरप्लेट काढली

Sachin Salve | Updated On: Feb 8, 2016 01:27 PM IST

IBN लोकमतचा दणका, चंद्रकांत पाटलांच्या गाडीची 'ती' नंबरप्लेट काढली

patil_carसोलापूर - 08 फेब्रुवारी : राज्यभरात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत गाडीची नंबर प्लेट फॅन्सी लावली होती. IBN लोकमतने हे वृत्त दाखवल्यानंतर अखेर सोलापूर परिवहन विभागाने कारवाई करत ही नंबर प्लेट ताब्यात घेत 100 रुपयाचा दंड ठोठावलाय.

आपल्या पक्षाचा सार्थ अभिमान असणे साहजिकच असतो. पण, कार्यकर्ते उत्साहाच्या भरात नियमांना धाब्यावर बसवून गाड्यांचे नंबर प्लेट असा अथवा कार्यालयं या ना त्या ठिकाणी नियम पायदळी तुडवत असता. राज्यभरात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू आहे. पण, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचं आयबीएन लोकमतने उजेडात आणलं. शनिवारी एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी  फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाडीचा वापर केला होता. MH -13 CF 8110 असा गाडी नंबर ही गाडी भाजप असं नाव दिसेल अशा पद्धतीने ही नंबरप्लेट लावण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांनी वापरलेल्या या फॅन्सी नंबर प्लेटच्या गाडीवर सोलापूर आरटीओनं कारवाई केली. गाडीची नंबर प्लेट ताब्यात घेतली असून गाडी मालकाला 100 रुपये दंड करण्यात आला. सोलापूर आरटीओचे विभाग प्रमुख खरमाटे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याच अजित ताम्हणकर यांनी सांगितलं. दंड आणि कारवाई जरी छोटी असली तरी मंत्र्यांच्या गाडीवर कारवाई होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2016 12:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close