टोलनाक्यांवर वाहनांची नोंद ठेवण्यासाठी यापुढे सरकारी यंत्रणा-मुख्यमंत्री

टोलनाक्यांवर वाहनांची नोंद ठेवण्यासाठी यापुढे सरकारी यंत्रणा-मुख्यमंत्री

  • Share this:

cm_on_tollकोल्हापूर - 08 फेब्रुवारी : कोल्हापूरचा टोल जरी रद्द झालेला असला तरी ज्या ठिकाणी 30 वर्षांसाठी टोल सुरू आहे त्या ठिकाणी आता राज्य सरकार स्वताःची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

भाजप सरकारने वचनपूर्ती करत अखेर कोल्हापुरातून टोल हद्दपार करण्यात आला. रविवारी टोलविरोधी कृती समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी टोलनाक्यांवर वाहनांची नोंद ठेवण्यासाठी राज्य सरकार स्वताःची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच या यंत्रणेतून टोलनाक्यावरुन ये जा करणार्‍या वाहनांची नोंद ठेवली जाईल. जर मुदतीपूर्वी टोलचे पैसे कंत्राटदाराला मिळाले तर उर्वरित रक्कमेतली 90 टक्के रक्कम ही राज्य सरकार आपल्याकडं घेणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2016 09:34 AM IST

ताज्या बातम्या