एनआयएच्या चौकशीत हेडलीचे 10 खुलासे

एनआयएच्या चौकशीत हेडलीचे 10 खुलासे

  • Share this:

headley32मुंबई - 08 फेब्रुवारी : मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात डेव्हिड हेडलीची साक्ष नोंदवण्याचं काम सुरू आहे. 4 वर्षांपूर्वी एनआयएच्या पथकानं अमेरिकेमध्ये जाऊन हेडलीची चौकशी केली. त्यामध्ये हेडलीनं महत्त्वाच्या 10 बाबी सांगितल्या. कोणत्या त्या पाहूयात....

 डेव्हिडनं एनआयएला काय सांगितलं?

1. लष्कर-ए-तोयबामध्ये प्रत्येक महत्त्वाची कृती हाफिझ सईदच्या परवानगीनंच होते. 26/11 च्या हल्ल्याची हाफिझला संपूर्ण माहिती होती

2. आयएसआयच्या संपूर्ण पाठिंब्यामुळेच मुंबई दहशतवादी हल्ला शक्य झाला. हल्ल्यापूर्वी टेहळणी करण्यासाठी हेडलीला आयएसआयच्या मेजर इक्बालने पैसा पुरवला होता

3. लष्कर-ए-तोयबाचा प्रत्येक महत्त्वाचा सदस्य किमान एका आयएसआय अधिकार्‍याकडून आदेश घेतो. हेडली हा मेजर इक्बाल आणि मेजर समीर अली यांच्याकडून आदेश घेत होता. तर लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशनल कमांडर झाकी उर रहमान लखवी हा ब्रिगेडियर रियाझकडून आदेश घेत होता

4. लखवीला अटक झाल्यानंतर, हल्ल्यामागचं कारस्थान जाणून घेण्यासाठी आयएसआयचे तत्कालीन प्रमुख लेफ्ट. जनरल शुजा पाशा यांनी तुरुंगात जाऊन लखवीची भेट घेतली होती

5. लष्कर-ए-तोयबाच्या मूळ योजनेनुसार, संघटनेचे दहशतवादी नेपाळ किंवा बांगलादेशामार्गे मुंबईत येऊन फक्त ताज  हॉटेलवर हल्ला करणार होते. मार्च 2008नंतर योजनेमध्ये बदल झाला. नव्या योजनेनुसार, दहशतवाद्यांना समुद्रामार्गे भारतात पाठवण्याचं आणि एकाचवेळी अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचं ठरलं

6. लष्कर-ए-तोयबानं भारतविरोधी कारवायांसाठी अबू याकूब या दहशतवाद्याच्या देखरेखीखाली नाविक दल स्थापन केलं होतं

7. मुंबईमधले दहशतवादी आणि त्यांना कराचीहून सूचना देणारे म्होरके यांच्यातलं संभाषण ऐकल्यानंतर हेडलीनं आदेश देणार्‍या तिघांचे आवाज ओळखले होते. साजिद मजिद, अबू अल कामा आणि अबू काहफा अशी त्यांची नावं होती

8. भारतावर दहशतवादी हल्ले करण्यासाठी लष्कर-ए-तोयबानं कराचीमध्ये भारतीय तरुणांचा सहभाग असलेला वेगळा गट तयार केला होता. अब्दुर रहमान उर्फ पाशा हा त्या गटाचा म्होरक्या होता. भारतामधल्या इतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये या अब्दुर रहमानचा सहभाग होता

9. एप्रिल 2007मध्ये, लष्कर-ए-तोयबानं भारतात शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा तस्करीमार्गे पोहोचवण्यासाठी खैबर पख्तुनख्वामधल्या नियामत शाह याला 8.5 लाख रुपये दिले होते. तो भारतामध्ये अंमली पदार्थांची तस्करीही करायचा

10. भविष्यात हल्ले करण्याच्या दृष्टीनं हेडलीनं मुंबईव्यतिरिक्त इतरही काही ठिकाणांची टेहळणी केली होती. त्यामध्ये दिल्लीमधल्या उपराष्ट्रपतींचं निवासस्थान, इंडिया गेट, पहाडगंडज, सीबीआय ऑफिस या इमारतींचा तसंच मुंबईतल्या एल आल (El AI) या इस्रायली एअरलाईनच्या ऑफिसचाही समावेश होता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 8, 2016, 9:00 AM IST

ताज्या बातम्या