चेंबुरमध्ये हाय प्रोफाईल मसाज सेंटरवर छापा, 9 जणांना अटक

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2016 12:48 PM IST

चेंबुरमध्ये हाय प्रोफाईल मसाज सेंटरवर छापा, 9 जणांना अटक

tantra231

मुंबई – 07 फेब्रुवारी : चेंबुरमध्ये हाय प्रोफाईल स्पा मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. यात 6 विदेशी मुलींसह 7 मुलींची सुटका करण्यात आली. स्पाच्या नावाखाली तिथे वेश्याव्यवसाय सुरू होता, असा पोलिसांचा आरोप आहे.

चेंबुरच्या प्रसिद्ध आणि उच्चभ्रू असलेल्या डायमंड गार्डनजवळ तंत्र थाई स्पा हे मसाज सेंटर सुरू होते. यात विदेशी मुलींकडून देहव्यापार करून घेतला जात होता. बिजनेस वीझाच्या नावाखाली या मुलींना थायलंडमधून आणण्यात आलं होतं. तंत्र थाई याच्या देशभरात 40च्या वर शाखा आहेत. या छाप्यात पोलिसांनी दलाल आणि दुकान मालक आणि कर्मच्यार्‍यांसह 9 जणांना अटक केली आहे. महिलांना चेंबुरच्या महिला सुधारगृहात पाठवण्यात आलं असून पुढील तपास चेंबुर पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2016 11:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...