S M L

म्हणे हेल्मेटसक्ती !, सहकारमंत्र्यांकडूनच वाहतुकीचे नियम धाब्यावर

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2016 10:00 PM IST

म्हणे हेल्मेटसक्ती !, सहकारमंत्र्यांकडूनच वाहतुकीचे नियम धाब्यावर

बार्शी - 06 फेब्रुवारी : कार्यकर्ते ते कार्यकर्ते पण आता मंत्रिमहोदयांनी कार्यकर्त्यांचा कित्ता गिरवलाय. राज्याचे सहकारमंत्री चंद्राकांतदादा पाटील यांनी वाहतुकीचे नियम मोडीत काढले असून आपल्या गाडीचा नंबर प्लेट 8110 वर कलाकुसर करून BJP असं केलंय. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहे.

राज्यात युती शासन एका बाजूला लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत म्हणून हेल्मेटसक्ती करताय तर दुसरीकडे त्यांच्याच खात्यातील मंत्री मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर ठेवताना दिसत आहेत. बार्शीत विविध कार्यक्रमासाठी आज सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आले होते. मात्र लाल दिव्याच्या ज्या गाडीत ते फिरत होते त्याचा गाडी नंबर मात्र वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली करणारा होता. MH -13 CF 8110 असा गाडी नंबर ही गाडी भाजप असं नाव दिसेल अशा पद्धतीने ही नंबरप्लेट लावण्यात आली आहे. खरंतर पक्षाचे कार्यकर्ते अशा प्रकारच्या नंबर प्लेट लावलेले आपण पाहतो मात्र मंत्रीच जर अशा नंबरच्या गाडीतून फिरायला लागले तर ट्राफिक पोलिसांनी कोणावर कारवाई करायची हा सवालच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2016 09:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close