News18 Lokmat

डॉक्टराची गुंडगिरी, केस पेपर हरवला म्हणून रुग्णाला बेदम मारहाण

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2016 09:01 PM IST

डॉक्टराची गुंडगिरी, केस पेपर हरवला म्हणून रुग्णाला बेदम मारहाण

लातूर- 06 फेब्रुवारी : 'डॉक्टर तुमचा मित्र' असं म्हटलं जात पण लातूरमध्ये या उलट प्रकार घडलाय. केस पेपर हरवले म्हणून डॉक्टरांनी डॉक्टरांनी आणि सुरक्षा रक्षकांनी दादागिरी करत चक्क रुग्णालाच बेदम मारहाण केली आहे.

लातूर शहरात राहणारे बाबुराव कुंभार यांना शुक्रवारी सायंकाळी अचानक चक्कर येऊ लागल्याने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या सोबत देखभालीसाठी त्यांच्या पत्नी रेखा कुंभार या देखील होत्या. कालपासून बाबुराव यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र, आज दुपारी अचानक एक डॉक्टर आले आणि त्यांनी केस पेपर हरवल्याच सांगत या पेशंटला दवाखाना सोडायला सांगितला. उपचार सुरू असताना असे अचानक बाहेर काढू नका अशी विनवणी बाबुराव कुंभार आणि त्यांच्या पत्नी रेखा कुंभार यांनी केली. मात्र आपल्याच डॉक्टरी थाटात धुंद असलेल्या डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकाला बोलावून बेदम मारहाण केली. मारहाण एवढी जबर होती की त्यात रेखा कुंभार यांचं तोंडाला इजा झाली तर बाबुराव यांच्या हाताला दुखापत झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2016 09:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...