वसईतल्या भोंदूबाबाने पुन्हा थाटले दुकान

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2016 02:26 PM IST

vasai_center3वसई - 06 फेब्रुवारी : इथल्या सुटाबुटातील भोंदूबाबाची भोंदुगिरी पुन्हा सुरू झालीये. या भोंदूबाबाच्या साथीला एसटी महामंडळ सामील झाले आहे. पोलीसही त्याला साथ देतायत असा आरोप मनसेनं केलाय. केंद्रात येण्याजाण्यासाठी एसटी बस,खासगी बस,टेम्पो,रिक्षा मोटारसायकल अशी अनेक वाहनं सतत येतायत. यानिमित्तानं वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात आहे. पण, या वाहनाकडे पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करतायत असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

आयबीएन लोकमतने सॅबस्टिन मार्टिनची भोंदूगिरी उघड केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वसई तहसीलदार,वसई पोलीस उपअधीक्षक नरसिंग भोसले यांना कारवाई करण्यासाठी एक लेखी निवेदन दिले होते. त्यांना कारवाईचे आश्वासन दिले. मात्र ते केंद्र पुन्हा सुरू झाल्याने मनसेने पोलिसांना कळवले. मात्र, पोलिसांनी आपले हात बांधले असल्याचा सांगितलंय. त्यामुळे मनसेने आपले हात आता सोडावे लागतील असा इशाराच दिला.

हा आशीर्वाद केंद्रातला भक्त संजय वासय काय सांगतो की, आत काही प्रकार नाही इथं चांगलं आहे जे दाखवतात ते चांगलं दाखवतात इथं आमचे आजार आहेत ते बरे होतात. त्याला विचारले की, तुमचा आजार बरा झाला का ?,तर तो म्हणतो की मला आजार नाही.

याचा अर्थ काय ?, यांना शिकवून पाठवून ठेवलं आहे हेच सिद्ध होत आहे.

या सगळ्या प्रकरणात लोकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. जर असे आजार बरे होत असतील तर रुग्णालयांना टाळे लावावी लागतील. एकही भक्त आम्हाला आजार बरं झाल्याचा अनुभव सांगू शकला नाही.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2016 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...