आता समुद्रकिनारी, उंच टेकड्यांवर सहलीला मनाई

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 5, 2016 08:12 PM IST

आता समुद्रकिनारी, उंच टेकड्यांवर सहलीला मनाई

trep323पुणे - 05 फेब्रुवारी : पुण्यातल्या अबेदा इनामदार कॉलेजमधल्या सहलीला गेलेल्या चौदा विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर आता शिक्षण उपसंचालकानी एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये विद्यार्थ्यांना अपघात होतील अशा आणि जोखीम असलेल्या ठिकाणी सहली नेण्यास बंदी घालण्यात आलीय.

मुरूडच्या समुद्रकिनार्‍यावर सहलीला गेलेल्या पुण्यातला अबेदा इनामदार कॉलेजमधल्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर शिक्षण विभागानं शालेय सहलींसाठी कडक नियम तयार केलेत. शालेय सहलींसाठी 27 मार्गदर्शक तत्वांचंं परिपत्रक शिक्षण उपसंचालकांनी जारी केलंय.

सहलीसाठी मार्गदर्शक तत्त्वं

- समुद्रकिनारे, अतिजोखमीच्या ठिकाणी सहल नेऊ नये

- नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या याठिकाणी सहल नेऊ नये

Loading...

- वॉटर पार्क, ऍडव्हेंचर पार्कच्या ठिकाणी सहल नेऊ नये

- माध्यमिक शाळेपर्यंतच्या मुलांना ट्रेकिंगसाठी नेऊ नये

- सहलीसाठी पालकांच्या मंजुरीचं पत्र आवश्यक

- 10 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असावा

- सहलीत मुली असल्यास एक महिला पालक प्रतिनिधी असावा

- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबादारी शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर

- आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्याचं शिक्षकांना प्रशिक्षण द्यावं

काही शाळांच्या शिक्षकांनी या परिपत्रकाचं स्वागत केलंय. तर काहींना नाराजी व्यक्त केलीये. अभ्यासक्रमाबाहेरच्या शिक्षणासाठी शालेय जीवनात सहल अतिशय महत्त्वाची आहे. पण सहल, काढताना योग्य ती काळजी घेतली तर मुरूडसारख्या दुर्घटना टाळता येतील.

मुरुडच्या सहल दुर्घटनेनंतर शिक्षण संचालक कार्यालय आणखी सहलीचे नियम कठोर करणार आहे. मात्र.सहली वर बंदी घालण्यात येणार नाही असं शिक्षण संचालक कार्यालयाचा म्हणणं आहे. आता सहल घेऊन जाणार्‍या शाळा हा परिपत्रक कुठपर्यंत पाळतात याकडे सर्वांच

लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2016 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...