विरारमध्ये बंदुकीचा धाक दाखवून महिलेचं अपहरण, 24 तास उलटूनही आरोप मोकाटाच

विरारमध्ये बंदुकीचा धाक दाखवून महिलेचं अपहरण, 24 तास उलटूनही आरोप मोकाटाच

  • Share this:

virar_kidnapविरार - 04 फेब्रुवारी : विरारमध्ये बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या एका 40 वर्षांच्या महिलेचं अपहरण करण्यात आल्याची घटना घडलीये. पोलीस मागील 24 तासांपासून आरोपीचा शोध घेत असून त्यांना अद्याप यश आलेलं नाही. शिल्पी वर्मा असं अपहृत महिलेचं नाव आहे. विरारच्या डोंगरपाडा परिसातून तिचं अपहरण झालं.

मुंबईजवळील विरारच्या पश्चिमेला शिल्पी वर्मा आणि आपल्या मैत्रिणीसह ग्लोबल सिटी इथं जात होत्या. त्यावेळी विवा कॉलेज परिसरात त्यांच्या कारचा धक्का एका व्यक्तीला धक्का लागला. यावरुन किरकोळ वादही झाला. पण त्यानंतर त्या व्यक्तीने शिल्पी वर्मा आणि त्यांची मैत्रिण निपुर कुमारी यांना बंदूक दाखवली आणि कारच्या मागच्या बाजूला बसून गाडी एक तास विरारमध्ये फिरवली. यानंतर विरारच्या डोंगरपाडा परिसरात टायर फुटल्याने गाडी एका खांबाला धडकली. त्यानंतर त्या व्यक्तीने शिल्पी वर्मा यांना बंदुकीचा धाक दाखवत रिक्षामध्ये बसवलं आणि फरार झाला. याप्रकरणी निपुर कुमारी यांनी अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेला 24 तास उलटून गेले आहेत. तरीही आरोपीचा आणि शिल्पी वर्मा यांचा पोलिसांना शोध लागलेला नाही.पोलिसांनी महिलेच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन केलंय. कसून शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 4, 2016, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading