युग चांडकच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा

युग चांडकच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा

  • Share this:

nagpur yug

नागपुर 04 फेब्रुवारी : नागपुरातल्या युग मुकेश चांडक या आठ वर्षीय चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी जिल्हा सत्र कोर्टाने दोन्ही दोषींना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावली आहे. सर्व साक्षी-पुरावे आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने याप्रकरणाचा आज (गुरूवारी) सकाळी निकाल दिला. खंडणीसाठी अपहरण करून चिमुकल्याचा खून केल्याप्रकरणी आरोपी राजेश दवारे (20) आणि अरविंद सिंग (19) या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली.

नागपूर इथल्या डेंटिस्ट डॉ. मुकेश चांडक यांचा 8 वर्षांचा मुलगा युगचे 1 सप्टेंबर 2010मध्ये राजेश आणि अरविंद या दोघांनी खंडणीसाठी अपहरण केलं होतं. सुरूवातीला त्यांनी युगच्या वडिलांकडे 5 कोटींची खंडणी मागितली. मात्र, त्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने या दोघांनी युगची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती.

या प्रकरणी आज कोर्टात अंतिम सुनावणी होऊन या दोन्ही आरोपींना कोर्टाने कठोर शिक्षा सुनावली. अपहरण आणि हत्या केल्याप्रकरणी फाशी, हत्येचा कट रचल्याप्रकरणी जन्मठेप तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 7 वर्षांची शिक्षा कोर्टाने सुनावली. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी आरोपींनी हा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांचे वय जरी कमी असलं तरी त्यांनी अत्यंत शांत डोक्याने कट रचून 8 वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्या केली. त्यामुळे त्यांचा गुन्हा माफ करण्यासारखा नसल्याचं कोर्टाने आपल्या निकालात नमूद केलं.

दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर युगचे वडिल डॉ. चांडक यांना कोर्टात रडू कोसळलं. त्यानंतर चक्कर येऊन ते बेशुद्ध पडलं. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अन्य डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 4, 2016, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading