राज्यात 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2016 03:37 PM IST

राज्यात 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक

Babli dam maharashtra photo DC_0_0

04 फेब्रुवारी : उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच राज्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात प्रमुख शहरांमध्ये सध्याच्या स्थितीत फक्त 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्हे पाणीटंचाईने होरपळून निघाले आहेत. पुणे, नाशिक अमरावती जिल्हात मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठे खालानले आहेत.

अपुर्‍या पावसामुळे राज्यात सर्वत्र टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणं शंभर टक्के भरलेली नाहीत. सर्वात कमी पाणीसाठा हा मराठवाड्यांमधल्या धरणांमध्ये आहे. यावर्षी फक्त आठ टक्केच हा साठा आहे.

राज्यातलं एक मोठं धरण असलेल्या जायकवाडीमध्ये फक्त सहा टक्के पाणीसाठा आहे. तर मराठवाड्यातली अनेक धरणं कोरडी ठाक आहेत. उन्हाळ्याचे अजून चार महिने बाकी आहेत. अशा स्थितीत पिण्याचे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न जिल्हा प्रशासना समोर निर्माण झाला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2016 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...