S M L

10 वर्षं निवडणूक बंदी का घालू नये ?, अजित पवारांसह सहकारसम्राटांना नोटीसा

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2016 07:03 PM IST

424ajit pawar and bank03 फेब्रुवारी : राज्य सहकारी बँक प्रकरणी संचालकांना 10 वर्षं निवडणूक बंदी घालण्यात आली आहे. आता सहकारसम्राटांना आणखी एक दणका देण्यात आलाय. 10 वर्षं निवडणूक बंदी का घालू नये अशा नोटीसाच सहकार खात्याने अजित पवारांसह इतर संचालकांना बजावल्या आहेत.

राज्य सहकारी बँकेच्या 77 संचालकांसह 10 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना सहकार खात्याकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यापुढे बँक डबघाईला आणल्या प्रकरणी जबाबदारी निश्चित होऊन आगामी दोन टर्म म्हणजे 10 वर्षं आपल्याला निवडणूक लढवण्यास बंदी का घालू नये अशा आशयाच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये राज्य सहकारी बँकेचे संचालक अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, आनंदराव अडसूळ, पांडुरंग फुंडकर, शेकापचे जयंत पाटील आदी राजकीय नेत्यांचा समावेश आहे. या नोटीशीला त्यांना 15 दिवसांत उत्तर द्यायचं आहे.

या सहकारसम्राटांना मिळाल्यात नोटीसा

अजित पवार

विजयसिंह मोहिते

Loading...

दिलीप सोपल

हसन मुश्रीफ

मधुकर चव्हाण

आनंदराव अडसूळ

पांडुरंग फुंडकर

जयंत पाटील

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2016 07:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close