पुन्हा मुंब्रा, आयसिससाठी काम करणारा तरुण एनआएच्या ताब्यात

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2016 05:25 PM IST

पुन्हा मुंब्रा, आयसिससाठी काम करणारा तरुण एनआएच्या ताब्यात

mumbra_boy34मुंबई - 01 फेब्रुवारी : दहशतवादी संघटना आयसिससाठी काम करणार्‍या मुंब्रा इथल्या आणखी एका तरुणाला रविवारी एनआयएच्या ताब्यात देण्यात आलंय. ठाण्यातल्या मुंब्रा इथून कामानिमित्त दुबईला गेलेला मोहम्मद फरहान मोहम्मद रफिक शेख हा तरुण आयसीससाठी काम करत असल्याचं आढळल्याने सगळ्यांचं लक्ष ठाण्याकडे वळलं होतं. हा तरुण गेले 6 महिने दुबई पोलिसांच्या ताब्यात होता. आता त्याला भारताकडे स्वाधीन करण्यात आलंय.

मुंब्रा येथून कामानिमित्त दुबई येथे गेलेला मोहम्मद फरहान मोहम्मद रफिक शेख हा आयसिससाठी काम करीत असल्याचे कळल्याने पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष मुंब्य्राकडे वळले आहे. मोहम्मद रफिक शेख हा गेले 6 महिने दुबई पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी संगणक अभियंता म्हणून कामानिमित्त दुबई इथं गेलेला फरहान शेख हा आयसिसच्या संपर्कात कसा याला याविषयी आपल्याला काहीच माहित नसल्याचे त्याच्या आजीचं म्हणणं आहे.

ISIS आणि मुंब्य्राचे एक नातेच जुळत जाते आहे की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुदब्बीर शेख याला एनआयए आणि एटीएस अधिकार्‍यांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष मुंब्य्राकडे वळले. त्यातच आता मोहम्मद फरहान मोहम्मद रफिक शेख हा युवक सुद्धा आयसिसचे काम करीत असल्याचा आरोप ठेऊन दुबई पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला आता भारताच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याचा ताबा दिल्ली एनआयएला देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2016 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...