भोंदूबाबाला दणका, प्रार्थना केंद्राला पोलिसांनी ठोकलं टाळं

भोंदूबाबाला दणका, प्रार्थना केंद्राला पोलिसांनी ठोकलं टाळं

  • Share this:

vasai_center3वसई - 01 फेब्रुवारी : वसईतल्या भोंदूबाबाच्या प्रार्थना केंद्राला पोलिसांनी अखेर टाळं ठोकलं आहे. गेले 5 दिवस IBN लोकमत ज्याचा सातत्यानं पाठपुरावा करत आहे, त्या भोंदूबाबा सबॅस्टिअन मार्टिनला पोलिसांनी दणका द्यायला सुरुवात केली आहे. आता सबॅस्टिअन मार्टिनला अटक होण्याची शक्यता आहे.

लोकांचे असाध्य आजार फक्त स्पर्शानं बरे करतो असा दावा करणार्‍या या भोंदूबाबाच्या 2 सहकार्‍यांना आज अटक करण्यात आली आहे. विष्णू कुडवे आणि वैभव तरे अशी त्यांची नावं आहेत. यापैकी विष्णू कुडवे हा आशीर्वाद प्रार्थना केंद्राचा व्यवस्थापक आहे. रविवारी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. याच प्रार्थना केंद्रामध्ये भोंदूबाबा सबॅस्टिअन मार्टिन बरं करण्याच्या नावाखाली लोकांना फसवत असे. आयबीएन लोकमत मागील आठवड्याच्या गुरुवारपासून वसईच्या या भोंदूबाबाची बातमी दाखवत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर या कारवाया होतायेत. आता सबॅस्टिअन मार्टिनला अटक कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सध्या सबॅस्टिअनच्या प्रार्थना केंद्रावर पोलिसांचा ताफा तैनात आहे.

संबंधित अपडेट्ससाठी इथं क्लिक करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2016 03:57 PM IST

ताज्या बातम्या