महिलांना शनीदर्शन का नाही ?, औरंगाबाद खंडपीठाची जिल्हाधिकार्‍यांना नोटीस

महिलांना शनीदर्शन का नाही ?, औरंगाबाद खंडपीठाची जिल्हाधिकार्‍यांना नोटीस

  • Share this:

aurangabad_courtऔरंगाबाद - 30 जानेवारी : शनी शिंगणापूर प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे. शनी शिंगनापूर प्रकरणी चार आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला ही नोटीस प्राप्त झालीये.

डॉक्टर वसुधा पवार यांनी शनीच्या चौथर्‍यावर पुरुषांसह महिलांनाही प्रवेश मिळावा आणि पूजेचा समान आधिकार मिळाला पाहिजे, या संदर्भात औरंगाबाद खंडपीठत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांसह पोलीस अधीक्षक, मुंबई धर्मादाय आयुक्त आणि राज्याचे विधि-न्याय खात्याचे मुख्य सचिवाना नोटीस बजावली आहे. शनी मंदिरात महिलांना प्रवेश का दिला जात नाही याबद्दल या नोटिसीमध्ये विचारणा करण्यात आली आहे. याबद्दल जिल्ह्याधिकार्‍यांना चार आठवड्यात खुलासा द्यायचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2016 06:43 PM IST

ताज्या बातम्या