IBN लोकमतचा दणका, भोंदूबाबावर कारवाईचं पोलिसांचं आश्वासन

IBN लोकमतचा दणका, भोंदूबाबावर कारवाईचं पोलिसांचं आश्वासन

  • Share this:

bhondubaba_vasai3वसई - 30 जानेवारी : आरारारा...करत तुमचे आजार बरे करेल असा दिव्य चमत्कार करणार्‍या भोंदूबाबा सॅबिस्टन मार्टिनवर कारवाई करण्याचे अखेर वसई पोलिसांनी आश्वासन दिलंय. आयबीएन लोकमतने या भोंदूबाबाचा पर्दाफाश केल्यानंतर दोन दिवसांनंतर पोलिसांनी अखेर पाऊल उचलले आहे. तसंच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाईचे आदेश दिले आहे. तर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

वसईमध्ये गेल्या 8 वर्षांपासून सॅबिस्टन मार्टिन या भोंदूबाबाने भोळाभाबड्या रुग्णांना असाध्य आजार बरे करण्याचे दुकान थाटले आहे.

किडनी, मधुमेह, गुडघ्याचे आजार हात लावताच बरे केले जातील असा विश्वास तो रुग्णांना देतोय. अखेर या भोंदूबाबाचा आयबीएन लोकमतने पर्दाफाश करत सॅबिस्टन मार्टिनची भोंदूगिरी सर्वांसमोर आणली. संमोहनाव्दारे तो लोकांची फसवणूक करत होता. असाध्य रोग बरे करण्याचा दावा करून त्यानं अनेकांना फसवल्याच्या घटनाही आम्ही उघड केल्या. त्या भोंदूकडून फसवले गेलेले लोक समोर आले आणि त्यांनी त्याची भोंदूगिरी उघड केलीय. गुरुवारपासून आम्ही या बातमीचा पाठपुरावा करत होता. आयबीएन लोकमतने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी यावर मौन सोडलंय. दोन महिन्यापासून तो भोंदू आश्रमात नसल्याचं शारदा राऊत यांनी सांगितलं. लोकांच्या तक्रारी आल्या असून त्यानुसार कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय.

पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान, या भोंदुबाबाचा पर्दाफाश केल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही या भोंदूबाबा प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. लोकांना कुणी फसवत असेल तर अशा बाबांना तात्काळ अटक झाली पाहिजे. या प्रकरणीची माहिती घेण्यात येत असून संबंधितांना कारवाईचे आदेश दिले आहे असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

धनंजय मुंडे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

वसईच्या भोंदू बाबा प्रकरणी संबंधीतांवर लवकर कारवाई करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं. आर.आर.पाटील यांनी गृहमंत्री असतांना जादूटोणा कायदा अंमलात आणला. आबांच्या निधनानंतर हा कायदा अस्तित्वात आला. डॉ. दाभोलकर यांनी या कायद्यासाठी खूप प्रयत्न केले. हा कायदा असताना असे भोंदूबाबा जादूटोणा करत असतील. हे कायद्याने चुकीचं असून यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही मुंडेंनी केली.

आयबीएन लोकमतचे सवाल

वसईच्या भोंदूवर कारवाईचं आश्वासन पण अटक कधी होणार ?

भोंदू सबॅस्टिअन मार्टिनवर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई कधी होणार ?

जादूटोणा विरोधी कायद्याचं कलम लावण्यासाठी आम्ही दाखवललेला व्हिडिओ पुरेसा नाही का ?

सबॅस्टिअन मार्टिनचा आश्रम कायमचा बंद का करू नये ?

राज्यात इतर ठिकाणीही सुरू असलेल्या भोंदूगिरीवर कठोर कारवाई कधी होणार ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2016 05:04 PM IST

ताज्या बातम्या