सुटाबुटातल्या भोंदूबाबावर पोलीस कारवाई करणार की नाही ?

सुटाबुटातल्या भोंदूबाबावर पोलीस कारवाई करणार की नाही ?

  • Share this:

vasai_bhondubabaवसई - 29 जानेवारी : ईश्वराच्या दैवीशक्तीद्वारे रूग्णांना बरं करण्याच्या नावाखाली फसवणार्‍या सुटाबुटातल्या भोंदूबाबाचा आयबीएन लोकमतने पर्दाफाश केलाय. 24 तास उलटूनही या भोंदूबाबावर कोणतीही कारवाई अजून झालेली नाही. वसईतला मॉर्डन भोंदू भोळ्याभाबड्या रुग्णांची बिनदिक्तपणे फसवणूक करतोय तरीही पोलिसांकडून त्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई होत नाहीये.

वसईच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्र या ठिकाणी जी शिबीरं सुरू असतात, त्यामध्ये असाध्य आजार झालेल्या रुग्णांना खडखडीत बरं करण्याचा दावा हा भोंदूबाबा करतो. सबॅस्टिअन मार्टिन असं या भोंदूबाबाचं नाव आहे. राजरोस आणि खुलेआम सुरू असलेल्या या शिबिरांचे व्हिडीओ युट्यूब आणि इतर सोशल मीडियावरही आहेत. पण पोलिसांना किंवा सरकारला याची कल्पनाच नाही. जादूटोणा विरोधी कायदा असतानाही या सबॅस्टिनवर कारवाई का होत नाही? त्याला अटक का होत नाही ? हाच खरा प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही पीडित रुग्णांना या भोंदूगिरीविरोधात आवाज उठवण्याचं जाहीर आवाहन करतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2016 12:34 PM IST

ताज्या बातम्या