कोल्हापूर – 28 जानेवारी : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडचा जामीन अर्ज आज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
गेल्या 25 तारखेला दोन्ही बाजूंच्या वकिलांनी साडेतीन तासांचा युक्तीवाद केला होता. त्यानंतर आजच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण सरकारी वकिलांनी अनेक प्रकारचे युक्तीवाद करत रुद्र पाटील फरारी असल्याचाही संदर्भ दिला होता. त्यानंतर आज कोल्हापूरच्या न्यायालयात एल. डी. बिले यांनी समीरचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता याबाबतची पुढची सुनावणी ही 9 फेब्रुवारीला होणार आहे. तर समीरनं कोल्हापूर बाहेर खटला चालवावा ही जी मागणी केलीय त्याबाबतची सुनावणीही मुंबई ऊच्च न्यायालयात 9 फेब्रुवारीच होणार आहे. त्यामुळे आता 9 फेब्रुवारीला होणार्या दोन्ही सुनावणींकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.
दरम्यान मेधा पानसरें यांनी जामीन फेटाळल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. तर समीरच्या वकिलांनी विचार करुन जामीनाबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv