Elec-widget

प्रवीण महाजन यांचे निधन

प्रवीण महाजन यांचे निधन

3 फेब्रुवारीप्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी प्रवीण महाजन यांचे निधन झाले आहे. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. गेले तीन महिने कोमात असलेल्या प्रवीण यांच्यावर या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेले दोन दिवस त्यांची प्रकृती खालावली होती अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. प्रवीण महाजन यांचा मृतदेह ताब्यात देण्याच्या प्रक्रियेबद्दल ज्युपिटर हॉस्पिटलचे प्रशासन पोलीस, जेल ऍथॉरिटी आणि सिव्हील सर्जन यांच्याशी चर्चा करणार आहे. तसे पत्र हॉस्पिटलच्या प्रशासनाने मीडियाला पाठवले आहे. मृत्यूचे प्रमाणपत्र दिल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचा की पोलिसांच्या? याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, पोस्टमॉर्टेमसाठी प्रवीण यांचा मृतदेह जे. जे. हॉस्पिटलमधे पाठवण्यात येणार आहे.मोठा भाऊ आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांची हत्या केल्याप्रकरणी 50 वर्षीय प्रवीण यांना जन्मठेप झाली होती. 22 एप्रिल 2006 रोजी प्रमोद यांच्यावर घरी जाऊन प्रवीणने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर 12 दिवसांनी प्रमोद यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. डिसेंबर 2007मध्ये या प्रकरणात दोषी ठरलेले प्रवीण नाशिकमधील जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 27 नोव्हेंबर रोजी त्यांची 14 दिवसांच्या पॅरोलवर सुटका झाली होती. पुन्हा तुरूंगात हजर होण्याच्या दिवशीच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रमोद महाजन हत्या खटल्याच्या वेळी प्रवीण महाजन यांनी प्रमोद यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले होते. परंतु त्यावेळी कोर्टाने ही सुनावणी इन कॅमेरा असल्याचे जाहीर केल्याने त्या आरोपांचा उलगडा होऊ शकला नाही. नाशिक जेलमध्ये असताना प्रवीण महाजन यांनी ' माझा आल्बम ' नावाचे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकातही प्रमोद महाजन यांची बदनामी करणारे अनेक प्रसंग प्रवीण यांनी लिहिलेत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2010 12:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...