मुंबई आयसिसच्या रडारवर - अहमद जावेद

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 25, 2016 07:37 PM IST

मुंबई आयसिसच्या रडारवर - अहमद जावेद

ahamad_javaedमुंबई - 25 जानेवारी : मुंबई ही आयसिसच्या रडारवर आहे अशी माहिती खुद्द मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिलीये. आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतलंय. आणखी काही जणांना ताब्यात घेतलं जाईल असंही त्यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझीव्ह मुलाखतीत सांगितलं.

सीरियातील दहशतवादी संघटना आयसिसने भारताकडे कूच केलीये. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर राजपथावर परेड आयसिसच्या टार्गेटवर असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिलीये. मुंबई नेहमी दहशतवाद्यांचं सॉफ्ट टार्गेट राहिले हे आतापर्यंत सिद्ध झालंय. आता मुंबई आयसिसच्या रडारवर असल्याची माहिती खुद्द मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिली. आयसीसचा प्रभाव वाढणं गंभीर आहे. एटीस आणि एनआयएनं काही लोकांना अटक केली आहे. आणखी काही जण रडावर आहेत असं अहमद जावेद यांनी सांगितलं. तसंच इंटरनेटच्या माध्यमातून कट्टरतावादाचा प्रचार होतोय. त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्षं ठेवावं असं आवाहनही त्यांनी केलं.

काही दिवसांपूर्वी मुंबईत आढळलेल्या पॅराग्लायडर्स प्रकरणाची चौकशी झालीये पण त्यात काही गंभीर आढळलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त आहे. नागरिकांनीही याबद्दल सतर्क राहावं कुणाला काही संशायस्पद आढळं तर त्यांनी नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी दिलं. विशेष म्हणजे आयसिसच्या संपर्कात असलेल्या दोन जणांना मुंब्रा आणि माझगावमधून ताब्यात घेतलंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2016 07:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...