दुष्काळचक्र, पाण्याअभावी काळविटाचा तडफडून मृत्यू

दुष्काळचक्र, पाण्याअभावी काळविटाचा तडफडून मृत्यू

  • Share this:

beed_kalvit3बीड - 25 जानेवारी : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याटंचाईमुळे बळीराजा हवालदील झालाय. दुष्काळाची झळ मुक्याप्राण्यांनाही बसत असून एका काळविटाचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू ओढावलाय.

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असून माणसाबरोबर आता वन्य जीव देखील हैराण झाले आहे. दुष्काळामुळे एका काळवीटाचा मृत्यू झालाय. पाण्याच्या शोधात असलेलं काळविटाचा तडफडून मृत्यू झालाय. पाण्याअभावी वन्य जीवांचे मोठे हाल सुरू आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वन विभाग असून जिल्ह्यात हरीण, काळवीट, मोर, लांडोर आदी प्राण्यांचं वास्तव्य आहे. सध्या सर्वत्र पाण्याचं मोठ्या प्रमाणावर संकट असल्यानं हे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. मात्र पाणी नसल्यानं त्यांना जीव गमवावा लागतोय.

Follow @ibnlokmattv

First published: January 25, 2016, 2:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading