औरंगाबादेतून आयसिसशी संबंधित असलेल्या एका संशयिताला अटक

  • Share this:

ISISI Attackऔरंगाबाद - 23 जानेवारी : दहशतवादी संघटना आयसिसविरोधातली एटीएसचं धडकसत्र आजही सुरूच आहे. आणि त्यामध्येच एटीएसनं आणखी एका संशयिताला औरंगाबादच्या वैजापूरमधून अटक केली आहे. मुअज्जम खान असं त्याचं नाव असल्याचं समजतंय. त्याला अटक करून लगेचच एनआयएकडे सुपूर्द करण्यात आलंय. ही कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीनं करण्यात आली. मुंबईनंतर औरंगाबादमधून ही अटक झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.

याआधी आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंबईमधून खान हुसेन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीये. एटीएस आणि एनआयएकडून चौकशी करण्यात आल्यानंतर हुसेनला काल शुक्रवारी अटक करण्यात आली. हुसेन माझगावचा आहे. तर गुरुवारी मुंबईतील मुंब्य्रातून मुदब्बीर शेख या तरुणाला अटक करण्यात आलीये.

त्यापूर्वी मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये एनआयएनं छापे टाकले आणि सहा संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तर 8 जणांची चौकशी सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2016 03:38 PM IST

ताज्या बातम्या