आयसिसच्या संपर्कात असलेल्या आणखी एका तरुणाला मुंबईतून अटक

  • Share this:

isis_pune_atsमुंबई - 23 जानेवारी : आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंबईमधून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय. हुसेन खान असं या व्यक्तीचं नाव आहे. एटीएस आणि एनआयएकडून चौकशी करण्यात आल्यानंतर हुसेनला शुक्रवारी अटक करण्यात आली.

हुसेन माझगावचा आहे. त्याआधी गुरुवारी मुंब्य्रातून मुदब्बीर शेख या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसंच मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये एनआयएनं छापे टाकले आणि सहा संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तर 8 जणांची चौकशी सुरू आहे. हे सगळेजण आयसिसच्या संपर्कात असल्याचा आणि इंडियन मुजाहिदीनचा शफी अरमार हा यामागचा मास्टरमाईंड असल्याचा संशय आहे.

26 जानेवारी टार्गेट

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कारण आयसीसकडून मोठा धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिलाय. महाराष्ट्रासह, आंध्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आण कर्नाटकमध्ये 2014 पासून आयसिस भरती करत आहे.

सिरीया आणि इराकमधले इंडियन मुजाहिद्दीनचे अतिरेकी आयसिसमध्ये भरती होत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिलीये. हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या अर्धकुंभसारख्या धार्मिक कार्यक्रमांवर आणि परदेशी पर्यटक असल्यानं गोवा आयसिसच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

Follow @ibnlokmattv

First published: January 23, 2016, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading