मुंब्य्रात आयसिसचा दहशतवादी?, एकाला घेतलं ताब्यात

मुंब्य्रात आयसिसचा दहशतवादी?, एकाला घेतलं ताब्यात

  • Share this:

mumbra_boy_isis_newsमुंबई - 22 जानेवारी : ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा इथं मुदब्बीर शेख नावाच्या आयसिसच्या संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आलंय. ही कारवाई महाराष्ट्र एटीएस आणि राष्ट्रीय तपास संस्था यांनी गुरुवारी रात्री केली.

मुंब्रामधल्या अमृत नगर भागात ही कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस मोहबीरवर नजर ठेवून होत्या. तो सोशल मीडियावर अतिशय सक्रिय होता. गेल्या 2 वर्षांपासून तो घरातूनच संगणकावर काम करत होता. त्याच्या घरातून काही गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेला त्याची 3 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे.

मुदब्बीरला पुढील तपासासाठी दिल्लीला घेऊन जाणार आहेत. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि कर्नाटकातही आयसिस या अतिरेकी संघटनेच्या संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. 26 जानेवरीला देशात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी घातपात करण्याचा या आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनेने कट केलाय. याआधीही कल्याणमधून चार तरुण आयसिसमध्ये सहभागासाठी गायब झाले होते. एनआयने कारवाई करत या चारही तरुणांना परत आणले होते. अलीकडे तीन तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याचा संशय आला होता. पण,तपासाअंती हे तीनही तरुण आयसिसच्या संपर्कात नसल्याचं समोर आलं.

कोण आहे मुदब्बीर शेख?

- 35 वर्षांच्या मुंब्रा इथे राहणारा तरुण

- शिक्षण बी.कॉम, वेब डिझायनिंगचा कोर्स केलाय, सध्या बेकार

- भारतात आयसिसचा महत्त्वाचा माणूस असल्याचा तपास संस्थांना संशय

- त्याने देशात अनेक ठिकाणी बैठका घेतल्या होत्या, असाही संशय

- तो ट्विटर-फेसबुकवर सक्रिय, संशयितांच्या संपर्कात

- गेल्या 3 वर्षांपासून सीरिया आणि इराकमधल्या म्होरक्यांच्या संपर्कात असल्याचा संशय

- त्याला आतापर्यंत 5 ते 7 लाख रुपये हवाला मार्गे मिळाले आहेत

- बॉम्ब बनवण्याचं ऑनलाईन प्रशिक्षण मिळवलं असल्याचा संशय

- मोबाईल टायमर बनवण्याचं सामान घरी सापडलं

Follow @ibnlokmattv

First Published: Jan 22, 2016 09:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading